RMES GIRGAUM ALUMNI ASSOCIATION

Hindi is the main language of RMES GIRGAUM ALUMNI ASSOCIATION facebook group. It is a CLOSED group. There are 730 participants in that group. So people rank it like a Small group. You can find this group by searching 211091022403911 on Google, Bing or Yahoo. 2015-02-25 16:15:13 is the closest date we have information about it.

आर एम ई एस गिरगांम अलुमानय असोशिएशन ची स्थापना गिरगावच्या खोताच्या वाडीतील सर नारायण चंदावरकर प्रार्थमिक व पूर्व प्रार्थमिक शाळा तसेच गिरगावातील राम मोहन इंग्लिश स्कूल च्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना तसेच दोन्ही शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मच्यार्यांना एकत्र आणण्या साठी झाली आहे . संस्थेच्या घटने प्रमाणे दोन्ही पैकी कुठल्या हि एका शाळेत कमीत कमी १ वर्ष शिक्षण घेतलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी संस्थे कडे आजीव सदस्यत्व मिळवण्या साठी विहित नमुन्यात अर्ज , करण्यास पात्र असतील आजीव सभासद शुल्क रुपये १६ आहे तसेच प्रवेश शुल्क रुपये 5 आहे . सभासदत्व अर्ज संस्थे च्या संकेत स्थळावर ( website ) www.rmes-alumni.in तसेच www.rmes-alumni.org येथे उपलब्ध आहे . दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थेचे मानद सभासद आहेत . शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी इथे एकत्र यावे आणि आपल्या शालेय जीवनातील आठवणीना उजाळा द्यावा ही सुप्त इच्छा आहे. आठवणी गोड असाव्यात . आपल्या कुठल्याही वक्तव्या मुळे कुठल्याही सभासदाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ह्याची सर्व सभासदांनी काळजी घ्यावी हि विनंती . इथे फक्त आपली शाळा आणि शाळे संदर्भातील विषय चर्चिले जातील . संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती इथे वेळोवेळी दिली जाईल तसेच संस्थेच्या मासिक सभा तसेच इतर कार्यक्रमाची आगावू सूचना येथे दिली जाईल . फक्त शाळेच्या संदर्भातील माहिती आणि शाळेचे तसेच शाळेच्या शिक्षकांचे फोटो आणि वेळोवेळी झालेल्या शालेय कार्यक्रमांचे आणि सहलीचे फोटो आणि सभासद शाळेत असतानाचे फोटो सभासदांनी इथे द्यावे . सर्व सभासदांनी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना सभासद होण्यासाठी उद्युक्त करावे हि संस्थेच्या कार्यकारी समितीची विनंती आहे .