आनंदाच्या झाडाखाली

Hindi is the main language of आनंदाच्या झाडाखाली facebook group. Having alot of group type in Facebook: close, open and secret and it is a CLOSED group. They attracted 3,350 members. So it is a Medium group. 668900989837492 is the identifier of this group with Facebook. Last update is on 2015-02-09 06:46:13.

संध्याकाळी एखाद्या नदीच्या काठावर बांधलेल्या पारावर बसून पाण्यात पाय सोडावे, तळपायाला होणाऱ्या गुदगुल्यांमुळे साऱ्या दिवसाचा शीण नाहीसा व्हावा, एक शांत भावना हृदयात खोल खोल झिरपावी आणि अश्यात आपल्या शेजारी असावे आपले आवडते माणूस.
खरोखर नदीच्या काठी न जाता सुद्धा, शब्दांनी ती भावना पोचवली ना तुमच्या मना पर्यंत?
असंच काहीतरी आपण केलं तर?
शब्दांचा वापर करून, जे जे उत्तम, आनंद देणारं छानसं काही आपण एकमेकांना सांगितलं तर?
ह्या धकाधकीच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आपण नक्कीच प्राप्त करू शकू.
करूया का प्रयत्न एकमेकांना काहीतरी चांगलं देण्याचा?
वैयक्तिक हेवे दावे, भांडणं, चिखलफेक ह्यांचा विचारही आपल्या समूहावर नको. कशी आहे कल्पना?
चला तर मग जमूया सारे आनंदाच्या झाडाखाली

सर्व मेम्बर्सनी हे लक्षात ठेवावे कि कुठल्याही पोस्ट करताना, त्यात, शिव्या, घाणेरडी भाषा, अश्लीलता, किंवा इतर काही ज्याला bad taste असं म्हणता येईल असं काहीही, पोस्ट करू नये.
राजकारण, धर्मविषयक चर्चाही इथे नकोत.

वाईट काय? हे ठरवण्याचे पूर्ण अधिकार, admin त्यांच्याकडे ठेवत आहे.
अयोग्य वाटलेल्या पोस्ट, कुठलीही चर्चा न करता त्वरित उडवून टाकल्या जातील…

माझी अगदी मनापासून इच्छा आहे कि मेम्बर्सनी आपल्या आयुष्यात घडलेल्या गमतीजमती, एखादा प्रसंग, एखादी घटना, चांगली कल्पना ह्याच्याबद्दल जरूर लिहावं.

आयुष्यातले चांगले वाईट अनुभव, वाचलेले, पाहिलेले, ऐकलेले चांगले असं काही, जरूर लिहा, एकमेकांशी छान गप्पा मारा, अगदी घरी गप्पा मारतो ना, तसं…… खूप आनंद द्या आणि घ्या ……
आणि दिवस आनंदात घालवल्याचे समाधान मिळवा.
आनंदाच्या झाडाखाली ह्या समूहावर कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यात येत नाहीत. इथे फक्त चांगले लेखन, काही share करण्यासारख्या चांगल्या गोष्टी, चांगले विचार, ज्ञान यांची देवाण घेवाण होते.
स्वतःची एखादी कला, किंवा त्याची छोटी मोठी जाहिरात करण्यावरही इथे फारसा कडक आक्षेप नाही, पण त्याच्याशी संबंधित आर्थिक उलाढालींना 'आनंदाच्या झाडाखाली' हा समूह कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.