अनुभव मंटप

अनुभव मंटप is a Hindi group. It is a CLOSED group. They attracted 11,370 members. So people rank it like a Huge group. You can find this group by searching 248597238552646 on Google, Bing or Yahoo. We last updated on 2015-02-25 03:48:06.

Anubhava Mantapa , Anubhav Mantap , Anubhava Mandap .

लिंगायत धर्मातील गुरु संकल्पना - लिंगायत संस्क्रुतिच मुळात गुरुचे आणि शिष्याचे त्याग व समर्पण यांवर आधारित आहे . ... महाभारतात एक द्रष्टांत येतो एकलव्य राजपुत्र नसल्यामुळे त्याला द्रोणाचार्याच्या गुरुकुलात प्रवेश मिळत नाहि . मग तो द्रोणाचार्याला गुरु मानून एकांतात धनुर्विद्या शिकतो , मग एके प्रसंगी द्रोणाचार्य एकलव्याला त्याचा उजवा अंगठाच गुरुदक्षिणा मागतो , व शिवकुलिन शिष्य एकलव्य ब्राह्मण गुरुला आपला अंगठा कोणतीहि पर्वा न करता राजिखुशी देउन टाकतो . पण विचार करा ईथे थोर कोण ठरतो स्वार्थि गुरु द्रोणाचार्य का एकलव्य ?

एकदा शरण हरळय्या बसवेश्वरांच्या उपकारांची जाण ठेवुन , त्या उपकारांची परतफेड करण्यासाठि आपल्या व पत्नी कल्याणम्माच्या पायांच्या कातडिने बसवण्णासाठि पादरक्षा , जोडे बनवतो . जेव्हा हि बाब बसवण्णाला कळते तेव्हा बसवण्णा त्या सुंदर पादरक्षा "शिवाची दौलत" म्हणुन डोक्यावर ठेवतात . व हरळय्याची गुरुदक्षिणा अस्विकार करतात . आमची लिंगायत संस्क्रुति आम्हाला हे त्याग व समर्पण शिकवते .

लिंगायत धर्मातिल गुरुची व्याख्या बसवण्णा स्वतः आपल्याला सांगतात . आणि आज आपले so called गुरु असलेले , किंवा म्हणवुन घेणारे मठाधिश आपल्याकडुन हजारो रुपयांची लूट करतात . मी माझ्या समस्त लिंगायत बांधवांना विनंती करतो कि , या आजच्या द्रोणाचार्यांच्या नादि लागु नका , नाहि तर पैसाहि जाईल व अंगठाहि .. बाकी आपण सुजाण आहात ... शरणु शरणार्थी ......

" हा कोणाचा , हा कोणाचा , हा कोणाचा असे नच म्हणवावे | हा आमुचा , हा आमुचा , हा आमुचा असेचि वदवावे | कुडलसंगमदेवा तुमच्या घरचा पुत्र म्हणावे !" - महात्मा बसवण्णा .